ETV Bharat / state

Butterfly species : अमरावतीत विविधरंगी फुलपाखरांचा नजारा; पोहरा मालखेड जंगलात आहेत फुलपाखरांच्या ८० प्रजाती

Butterfly species : निसर्ग हा विविध रंगांनी बहरलेला आहे. जिथे जिथे फुले आहेत तिथे तिथे फुलपाखरे आहेतच. फुलपाखरांशिवाय कोणत्याही बागेला शोभा नाही. अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड जंगलात (Pohara Malkhed Forestt) फुलपाखरांच्या 80 प्रजाती आढळतात.

Butterflies In Amravati
पोरा मालखेड जंगलात फुलपाखरांच्या 80 प्रजाती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 6:19 PM IST

Updated : Oct 7, 2023, 6:50 PM IST

अमरावती Butterfly species : लहान मोठी झुडपं, फुलांचा बगीचा यासह गवतांवर रुंजी घालणारी विविधरंगी फुलपाखरं प्रत्येकाला आकर्षित करतात. अशा विविधरंगी आणि अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या एकूण 80 प्रजाती अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा मालखेड जंगलात (Pohara Malkhed Forest) सापडतात. जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त शहरातील काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. जयंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज खास फुलपाखरू निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जंगल भ्रमंतीद्वारे विद्यार्थ्यांनी विविधरंगी फुलपाखरे पाहिली आणि त्याबाबत सविस्तर माहिती देखील जाणून घेतली.

संपूर्ण देश फुलपाखरांनी समृद्ध : संपूर्ण भारतात फुलपाखरांची जैवविविधता ही समृद्ध आहे. आपल्या देशात फुलपाखरांच्या सुमारे पंधराशे प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्रात एकूण 288 फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्यात 80 फुलपाखरे आहेत. पोहरा मालखेड आणि वडाळीच्या जंगल परिसरात फुलपाखरांच्या ऐंशी प्रजाती असल्याची माहिती प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

फुलपाखरांच्या प्रजाती : फुलपाखरांचं अस्तित्व हे त्यांचं खाद्य आणि वनस्पतीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. भारतातील वेगवेगळ्या जंगलात झाडांच्या विविध प्रजाती आहेत. विविध जंगलांमध्ये झाडांचं स्वरूप ज्याप्रमाणे बदलतं त्याप्रमाणेच त्या भागात फुलपाखरांच्या प्रजाती देखील बदलत जातात. फुलपाखरं ही पूर्णतः झाडांवर अवलंबून असतात. वाटेल त्या झाडावर फुलपाखरू अंडी घालत नाही तर प्रत्येक फुलपाखराचं एक ठराविक झाड निश्चित असतं. या झाडांना त्या फुलपाखरांचे 'होस्ट प्लांट' असं म्हटलं जातं.

असे आहे फुलपाखरांचे आयुष्य : मोहरी किंवा खाकस इतक्या बारीक असणाऱ्या अंड्यातून तीन ते चार दिवसात बारीक अळी बाहेर येते. ती अळी साधारण आठ दिवसात एक ते दोन इंच वाढते. ज्या झाडावर असणाऱ्या अंड्यातून ती अळी बाहेर पडते त्या झाडांची पाने ती मोठ्या प्रमाणात खाते. त्या अळीला असणारे अँटिना आणि त्यांच्या पायांमध्ये असणाऱ्या केमिकलद्वारे आपला होस्टप्लांट ओळखतात आणि त्यावरच जगतात. रुईचे झाड, तरोट्याचे झाड, पिंपळाचे झाड, कढीपत्त्याचे झाड, लिंबूचे झाड अशा ठिकाणी फुलपाखरं अंडी घालतात. अंड्याचा काळ, अळीचा काळ, त्यानंतरची लहान अवस्थेतील फुलपाखरू आणि पूर्ण वाढलेले फुलपाखरू अशा चार टप्प्यांमध्ये फुलपाखरांचे आयुष्य असते. साधारण मोठे फुलपाखरू हे 15 ते 20 दिवस जगतात आणि लहान फुलपाखरांचे आयुष्य त्यापेक्षा देखील कमी असते अशी माहिती प्रा. डॉ.जयंत वडतकर यांनी दिली.

'ब्ल्यू मोर्मन' आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू : भारतात सर्वात लहान आकाराचे म्हणजे अगदी करंगळीच्या नखा एवढे ग्रास ज्वेल हे सर्वात लहान फुलपाखरू आहे. त्याच्या पंखांचा आकार एक सेंटीमीटर पेक्षा देखील कमी आहे. देशातील सर्वात मोठे साऊथरन बर्डविंग हे फुलपाखरू असून त्याचा आकार 19 सेंटीमीटर इतका आहे. 'ब्ल्यू मॉर्मोन' हे (Blue Morman Butterfly) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखाचा विस्तार 120 ते 150 मिलिमीटर इतका असून हे फुलपाखरू राज्यातील सर्वच भागात आढळत असल्याचं प्रा. डॉ.जयंत वडतकर यांनी सांगितलं.

जंगल भ्रमंतीत आढळलेले फुलपाखरं : अमरावती शहरातील मालखेड जंगल परिसरात हाच फुलपाखरू निरीक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना लेमन पँसी, कॉमन क्रो, एरंडक, रुईकर, निलरुईकर, बट्टी ,पट्टेरी कावडा, ठिपकेदार कावडा, कावडा, निल रेखा, बुंडी निल रेखा , पठारी पांडव, निलांबरी, रूपरेखा, गौरांग, तृण पिताती, निरंक तृणपिताति, चट्टेरी भटक्या, भटक्या, विमुक्ता, झिंगोरी, छोटी रत्नमाला असे विविधरंगी सुंदर फुलपाखरू आढळून आले.

हेही वाचा -

  1. Kal Lavi Conservation Project : 'कळलावी' भांडण लावणारी नाही, तर 'व्याधिमुक्त' करणारी वनस्पती; जाणून घ्या 'कळलावी'चे फायदे
  2. Moha Tree In Melghat: मेळघाटातील मोहाचा प्रवास दारूकडून औषधीकडे; आदिवासींनाही मिळाला विकासाचा मार्ग
  3. Bear on Tree : झाडावरच्या खुणा सांगतात 'या' परिसरात आहे अस्वल... पाहा व्हिडिओ

अमरावतीच्या पोरा मालखेड जंगलात विविधरंगी फुलपाखरू

Last Updated : Oct 7, 2023, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.