ETV Bharat / state

Accident in Amravati : ट्रक कारच्या धडकेत पाच ठार; नांदगावपेठ रिंग रोडवर दुर्घटना - Nandgaon peth ring road accident

तवेरा गाडीने अंजनगाव सुर्जी येथील एक कुटुंब लग्नानिमित्त रिंग रोड वरून वलगाव कडून नांदगाव पेठच्या दिशेने जात असताना पोटे कॉलेज पासून काही अंतरावरच तवेरा गाडीने एका दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक तवेरा गाडीवर आदळला.

कारचा चुराडा
कारचा चुराडा
author img

By

Published : Mar 27, 2022, 1:26 PM IST

अमरावती - अमरावती शहरातून जाणाऱ्या नांदगाव पेठ देवलगाव रिंग रोडवर तवेरा आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला असून ट्रकचे दोन्ही चाक बाहेर आले आहेत.

ट्रकचे दोन्ही चाक निघाले
ट्रकचे दोन्ही चाक निघाले

असा झाला अपघात - तवेरा गाडीने अंजनगाव सुर्जी येथील एक कुटुंब लग्नानिमित्त रिंग रोड वरून वलगाव कडून नांदगाव पेठच्या दिशेने जात असताना पोटे कॉलेज पासून काही अंतरावरच तवेरा गाडीने एका दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक तवेरा गाडीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की तवेरा गाडीवर आदळलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांब तोडून रस्त्याच्या कडेला गेला. अपघात झाल्याचे लक्षात येताच लगेच कंपनीत काम करणारे कामगार धावून आले. तवेरा मधील पाच पैकी चारजण घटनास्थळीच ठार झाले होते. तर एका व्यक्तीला नागरिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ट्रकची अवस्था
ट्रकची अवस्था

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली पाहणी - अपघातानंतर या मार्गावरून जात असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करून अपघातासंदर्भात माहिती घेतली. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून नांदगाव पेठ पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.