ETV Bharat / state

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 399 नवे कोरोनाबाधित

author img

By

Published : Feb 14, 2021, 8:59 PM IST

मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे.आज तर अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले, गेल्या 24 तासांमध्ये 399 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून देखील उपायोजनांवर भर दिला जात आहे.

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक
अमरावतीत कोरोनाचा उद्रेक

अमरावती - मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे.आज तर अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले, गेल्या 24 तासांमध्ये 399 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून देखील उपायोजनांवर भर दिला जात आहे. आज रविवार असल्याने अमरावतीच्या डी मार्टमध्ये मोठी गर्दी झाली होती. परंतु ही गर्दी टाळण्यासाठी सोशल डिन्स्टसिंगवर भर देण्यात आल्याने, मार्टबाहेर ग्राहकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.

एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, अमरावतीत मात्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात तबल 399 नवे कोरोना रुग्ण आढल्याने खळबळ उडाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 453 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25 हजार 294 वर पोहोचला आहे. त्यापैकी 23 हजार 754 जणांनी कोरोनवर मात केली आहे.

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक

महाविद्यालये बंदच

फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मागितलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली आहे. आणखी 2 आठवडे महाविद्यालये बंदच राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करणे बंधनकारक नाही असेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटले आहे. अमरावती विभागात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागातील सर्वाधिक कोरोना रुग्ण जिल्ह्यात

मधल्या काळात अमरावती जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत होते. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विभागात सध्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. मरावती शहरातील राजापेठ, बेलापूर, दस्तुरनगर, साई नगर आणि रुक्मिणी नगर या भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात घरो-घरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.