ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी ; जिल्ह्यातुन 30 हजार कार्यकर्ते होणार सहभागी - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये ( Bharat Jodo Yatra ) सहभागी होण्याकरिता अमरावती जिल्ह्यातून सुमारे 30 हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहे. शहरातून पाच हजार तर ग्रामीण भागातून पंचवीस हजार कार्यकर्ते पोहचणार असल्याची माहिती माजी मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेत जिल्ह्यातुन 30 हजार कार्यकर्ते
author img

By

Published : Nov 5, 2022, 12:09 PM IST

अमरावती : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये ( Bharat Jodo Yatra ) सहभागी होण्याकरिता अमरावती जिल्ह्यातून सुमारे ३० हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शहरातून 5 हजार तर ग्रामीण भागातून 25 हजार कार्यकर्त्यांचा त्यात समावेश राहणार असल्याची माहिती माजी मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे.

शेगाव ला होणार जाहीर सभा : वाशिम जिल्ह्यातील जहागीर येथून ही यात्रा सुरू होणार असून सकाळी सहा वाजता वीरेंद्र जगताप यांच्या धामणगाव रेल्व, चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर येथील दोन हजार कार्यकर्ते खासदार राहुल गांधी सोबत चालणार आहेत. १७ नोव्हेंबर रोजी पातुर येथून पदयात्रेत सकाळी सहा वाजता तसेच १८ आणि गांधी १९ नोव्हेंबरला संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन १८ तारखेला शेगाव येथे जाहीर सभेला उपस्थित राहतील.

14 ही तालुक्यातुन कार्यकर्ते सहभागी होणार : या यात्रेमध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ ही तालुक्यामधील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते शेतमजूर व स्वयंस्फूर्तीने दाखल होऊन खासदार राहुल गांधी यांचे विचार सभास्थळी ऐकणार आहेत. शेगाव येथील जाहीर सभेसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची व्यवस्था शेगाव येथे केलेली आहे.

काँग्रेसचे पदाधिकाराची उपस्थिती : या संदर्भातील नियोजनाकरिता आयोजित सभेला माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू, आ. बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप , जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे , संजय लायदे अध्यक्ष जिल्हा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सभे करता सर्व काँग्रेस पदाधिकारी नेते मंडळींनी स्वखर्चाने उपस्थित राहून काँग्रेसचा हात मजबूत करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रीत सहभागी होण्याचे आव्हान याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

2 हजार कार्यकर्ते पायी चालणार : 19 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्या पासून राहुल गांधी यांच्यासोबत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2 हजार कार्यकर्ते पायी चालणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बळवंत वानखडे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.