अमरावती : राज्यस्तरीय स्वाभिमान कृषी महोत्सवात आयोजित महारक्तदान शिबिरात 2830 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शांती इव्हेंट मॅनेजमेंट व युवा स्वाभिमान पार्टी संयुक्त उपक्रमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांनी प्रत्येक रक्तदात्यांचा ब्लू टूथ हेडफोन,स्मृतिचिन्ह व सन्मान पत्र देवून सन्मान केला. तर संकलित झालेल्या हजारो पिशव्यांनी ज्येष्ठ समाजसेवक, धर्मगुरू व पत्रकारांची रकत्तुला करण्यात आली. एकाच वेळी 11 जणांची प्रथमच रक्ततुला करण्यात आली.
रक्त संकलित केले : या भव्य रक्तदान शिबिरात डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी, इरविन रक्तपेढी, बालाजी रक्तपेढी, ब्रह्मा रक्तपेढी, जिवनज्योती रक्तपेढी नागपूर,स्वामी रक्तपेढी अकोला आदींनी आपली अनमोल सेवा प्रदान करून रक्त संकलित केले. युवा रक्तदान समितीचे वीरेंद्र उपाध्याय, पवन केशरवाणी, कुणाल केवटकर, धनंजय लोणारे, विकी बिस्ने,आशिष कावरे, आदींनी या रक्तदान शिबिराचे अतिशय सुंदर नियोजन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी केले तर संचालन सुधीर लवणकर व विनोद गुहे यांनी केले.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : खासदार नवनीत राणा यांनी यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे सांगून रक्ताअभावी कोणत्याही रुग्णांचे हाल होवू नये यासाठी युवा स्वाभिमान पार्टी सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाचे पुण्यकर्म करत असते. खासदार म्हणून आपण जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या रहाव्या यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत असून मेळघाट असो किंवा अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चांदुर बाजार, परतवाडा, अचलपूर, तिवसा, धारणी, चिखलदरा, चुरणी,आदी सर्व तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे खासदार नवनीत रवी राणा यांनी सांगितले.
रवी राणा यांचा भव्य सत्कार : युवा स्वाभिमान रक्तदान समितीच्या वतीने खासदार नवनीत रवी राणा यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सूनिलभाऊ राणा यांच्या नेतृत्वात वीरेंद्र उपाध्याय, पवन केशरवाणी, जितु दुधाने, संजय हींगास्पुरे,शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, नितीन बोरेकर, विनोद जायलवाल, विनोद गुहे,पराग चीमोटे, सचिन भेंडे, आशिष कावरे, मनोज डहाके, नितीन अनासाने, देवुळकर काका, कुणाल केवतकर धनंजय लोणारे,विकी बीसने, कयुम भाई, अर्जुन दाते, अविनाश काळे, नितीन म्हस्के, पवन हिंगणे, मंगेश कोकाटे, अजय देशमुख, अमोल कोरडे, किरण श्रीराव, मनीष अगरवाल, अनुराग चंदनानी, मंगेश पाटील इंगोले, नरेंद्र हरणे, उमेश आगरकर आदींनी परिश्रम घेतले.यावेळी आमदार प्रताप भाऊ अडसड, शंकररावजी हिंगासपुरे, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या सितादिदी,समाजसेवक गोविंदजी कासट, सुदर्शनजी गांग, ज्येष्ठ पत्रकार देविदासजी सुर्यवंशी मामा, चंद्रकुमारजी उर्फ लप्पी भाऊ जाजोदीया, बाबासाहेब शिरभाते, शैलेंद्र कतुरे यांची खासदार नवनीत रवी राणा यांच्या उपस्थितीत भव्य रक्ततुला करण्यात आली.
महोत्सव बंद करण्याचे आदेश : दरम्यान महोत्सवाच्या गेटवर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, यांचे फोटो असल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत महोत्सव बंद करण्याचे आदेश काढत नोटीस दिली होती. जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीत आचार संहिता लागली असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु तरीही आमदार रवी राणा यांनी या कारवाईला जुमानता कृषी प्रदर्शनी मात्र सुरूच ठेवले. जिल्हाधिकारी अमरावती यांचे आचार संहिता पथकाला सायन्सकोर मैदान अमरावती येथे दिनांक १२ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच ठिकाणी राजकीय पक्षाचे छायाचित्राचे बॅनर्स लागल्याचे उद्घाटन कार्यक्रम पार पडल्याचे व संबंधीत राजकीय पक्षाच नेत्यांनी संबोधन भाषण केल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचार संहितच्या अंमलबजावणीसाठी सायन्सकोर मैदान अमरावती भौतीकदृष्टया त्वरीत रिकामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद अमरावतीचे जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी दिले होते.
हेही वाचा : MLA Ravi Rana: युवा स्वाभिमान महोत्सव! आमदार राणा आचारसंहितेमुळे अडचणीत