अमरावती : जिल्ह्यातील ढगा गावाजवळ एसटी बस आणि ट्रक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सुमारे २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
ट्रॅक्टरच्या धडकेनंतर कोसळली बस..
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरहून वरुड येथे जात होती. ढगा गावाजवळच्या पुलावर ही बस आली असता, एका ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे बस बाजूला गेली. पुलाचे कठडे मजबूत नसल्याने ही बस थेट खाली कोसळली. या अपघातात बसचालकाचा हात तुटून खाली पडल्याचे समजत आहे. तर कित्येक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
यानंतर जखमींना तातडीने वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथे उलटला टँकर