ETV Bharat / state

अमरावतीत इमारतीवरून पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू - अमरावती

रंगोली लॉनमागे एका अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

अमरावतीत इमारतीवरून पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
author img

By

Published : May 2, 2019, 9:22 PM IST

अमरावती - रंगोली लॉनमागे एका अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही मुलगी मंगळवारी इमारतीवरून पडली होती. तिचा उपचारादरम्यान आज रेडिएंट रुग्णालयात मृत्यू झाला.

इंद्रायणी विनोद खोकले (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवरी सकाळी इंद्रायणी ३ मजली असणाऱ्या गुरुकृपा अपर्टमेंटच्या गच्चीवर बसली असताना अचानक खाली पडली. इंद्रायणी खाली पडताच अपर्टमेंटमध्ये एकच खळबळ उडाली. इंद्रायणी खाली पडली तेव्हा घरात आई एकटीच होती. वडील लग्नाला गेले होते, तर बहीण परीक्षा द्यायला गेली होती. इंद्रायणी गणेशदास राठी विद्यालयात नवव्या वर्गात होती. इंद्रायणीला त्वरित जिल्हा समान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला रेडिएंन्ट रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. ३ दिवसांच्या उपचारानंतर आज इंद्रायणीची प्राणज्योत मालवली.

Intro:( मृत इंद्रायणी चा फोटो मेलवर पाठवतो)
रंगोली लॉनच्या मागे एका अपर्टमेंटच्या टेरेसवरून १४ वर्ष वयाची मुलगी मंगळवारी खाली पडली होती आज उपचारादरम्यान तिची रेडिएंट रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

Body:इंद्रायणी विनोद खोकले(१५) असे मृत मुलीचे नाव आहे. ममगळवरी( ३० एप्रिल) ला सकाळी इंद्रायणी तीन मजली असणाऱ्या गुरुकृपा अपर्टमेंटच्या गच्चीवर बसली असताना अचानक खाली पडली. इंद्रायणी खाली पडताच अपर्टमेंटमध्ये खळबळ उडाली. इंद्रायणीला त्वरित जिल्हा समान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला रेडीएन्ट रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर आज इंद्रायणीची प्राणज्योत मालवली.
इंद्रायणीचे वडील शेतकरी असून आई शुभांगी गृहिणी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी पयोशणी ही मोठी बहीण होते. इंद्रायणी गणेशदास राठी विद्यालयात नवव्या वर्गात होती.
इंद्रायणी खाली पडली तेव्हा घरात आई एकटीच होती. वडील लग्नाला गेले होते तर बहीण परीक्षा द्यायला गेली होती.आज इंद्रायणीला मृत घोषित केल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन केल्यावर इंद्रायणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे तिरुपती नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.