अमरावती - बसस्थानकाकडे सायकलने जाणाऱ्या तरुणाला कांद्याने भरलेल्या ट्रकने चिरडले. ही घटना अंजनगाव सूर्जी येथे सोमवारी दुपारी घडली. अमन संजय रेखाते असे त्या बालकाचे नाव आहे. ट्रक मागे घेताना ट्रकच्या मागील चाकात अमन आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी अमन ( वय १४ वर्ष ) हा शिवभोजन थाळी केंद्रातून जेवण करून निघाला होता. हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनगाव-अकोट रोडवरील जुन्या बसस्थानकावर श्रीराम ऑटोमोबाईल समोर कांद्याने भरलेला ट्रक होता. यावेळी समोर गर्दी असल्यामुळे ट्रक चालकाने ट्रक रिव्हर्स घेतल्याने मागील चाकात अमन आला. यात त्याच्या मेंदूचा अर्धा भाग पूर्णतः चेंदा झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. गाडी चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
गणेश मारोती शनिवारे असे त्या ट्रकचालकाचे नाव असून तो परसापूर येथील रहिवासी आहे. तर ट्रक पथ्रोट येथील व्यक्तीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी ठाणेदार राठोडसह यांच्यासह पथकाने धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. अमन हा यावर्षी नवव्या वर्गात गेला असून तो पंचफुलाबाई हरणे विद्यालयाचा विद्यार्थी होता.