ETV Bharat / state

मध्य प्रदेशात जाणारे 111 मजूर ताब्यात; समृद्धी महामार्गाचे काम थांबल्याने उपासमार

लॉकडाऊनमुळे सर्वत्र बांधकाम बंद असल्याने त्यावर काम करणारे मजूर अडचणीत आले आहेत. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 111 मजूर गावी जात असताना मंगरुळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित मजूर मध्यप्रदेशचे असून कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय.

lockdown in amravati
मध्यप्रदेशात जाणारे 111 मजूर ताब्यात; समृद्धी महामार्गाचे काम थांबल्याने उपासमार
author img

By

Published : Apr 16, 2020, 3:53 PM IST

अमरावती - लॉकडाऊनमुळे सर्वत्र बांधकाम बंद असल्याने त्यावर काम करणारे मजूर अडचणीत आले आहेत. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 111 मजूर गावी जात असताना मंगरुळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित मजूर मध्य प्रदेशचे असून कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय.

गेल्या दोन वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या कामासाठी मध्य प्रदेशातील मजुरांनी अमरावतीत स्थलांतर केले. मात्र, मागील काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्याने या महार्गाचे काम बंद झाले. अशातच कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अखेर या मजूरांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटूंबासह मध्यप्रदेशात जात असताना
या 111 मजूरांना मंगरुळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची तपासणी पार पडली आहे.

कारंजा लाड येथे समृद्धी महामार्गाचे कामकाज करण्यासाठी हे मजूर आले होते. मात्र कंत्रादरकडून सोय होत नसल्याने त्यांनी गावाकडे पायपीट करण्याचा निंर्णय घेतला. यामध्ये मध्य प्रदेशातील ८६ व २५ मजूर विविध भागांतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.