अमरावती : संपूर्ण जगभरात ५०० पेक्षा अधिक श्वानांच्या जाती व प्रजाती अस्तित्वात असल्याची माहिती आहे. या बाबीपासून अमरावती शहरवासी अपरिचित आहेत. या सर्व जाती-प्रजातींच्या श्वानाची ओळख अमरावती शहरवासीयांना व्हावी, तसेच त्यांची देखभाल नेमकी कशी करावी? हा उद्देश नजरेसमोर ठेऊन खासकरून या डॉग शो चे अमरावती कैनल क्लबच्या वतीने पहिल्यांदा सायन्सकोर मैदानात रविवारी भव्य डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते.
३०० पेक्षा जास्त श्वानांनी केली होती नोंदणी : यामध्ये अफफंन, अफगाण, हाउंड, आफ्रिकानिस, डाबरमेन,बुलडोग, लैब्रियन, प्रजातींसह अनेक प्रजातीच्या श्वानाला सोबत घेऊन या डॉग शो मध्ये सर्वांचे लक्ष वेधले होते. ३००पेक्षा जास्त नोंदणी झालेल्या या डॉग शो मध्ये संपूर्ण राज्यभरातून आलेल्या श्वानप्रेमींनी या डॉग शो मध्ये प्राणी सरंक्षण कायदा, प्राणी कुर्ता अधिनियम, प्राणी प्रजनन व नियमन कायद्याचे सुद्धा महत्व यावेळी मनपाच्या पशुसंवर्धन विभागाचे पशु शल्य चिकित्सक-डॉ. सचिन बोन्द्रे यांच्या जवळून महत्व जाणून घेतले. आकर्षक बक्षिसांची मालिका व चषक विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने या डॉग शोला एक आगळेवेगळे वलय लाभल्याचे दृश्य यावेळी उपस्थितांचे गर्दीतून दिसून आले. यासोबतच जागोजागी लावण्यात आलेल्या स्टोलधारक यांचेकडून श्वानांच्या बाबतीत घ्यावयाची काळजी , आहार व्यवस्थापन, नियमितपणे देखभाल करण्यासंदर्भात श्वान पालकांना यावेळी पूरक माहिती देण्यात आली.
श्वान पालकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित : या डॉग शोच्या यशस्वीतेसाठी अमित तिरपुडे, निखिल कलमबे,श्याम आळंदीकर,जगदीप श्रॉफ,आदिसहित अमरावती कैनल क्लब,अमरावती महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग, वर्ल्ड अनिमल प्रोटेक्शन इंडिया, अमित बिहुले, शुभम लोखंडे, आदिसहित श्वानप्रेमींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी श्वान पालकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या आयोजन संदर्भात डॉ. सचिन बोन्द्रे व आयोजन समिती सदस्यांनी यावेळी दिली.
आंतरराष्ट्रीय श्वान दिवस : दरवर्षी 26 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करण्यात येतो. सर्व जातीची कुत्री पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्वान किंवा कुत्रा हा मनुष्याचा लाडका प्राणी आहे. तसेच तो मनुष्याचा प्रामाणिक मित्र आहे. कुत्र्यांच्या संदर्भात काम करणाऱ्या कॉलिन पायगे या व्यक्तीने 26 ऑगस्ट 2004 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा केला होता.