अकोला - वान प्रकल्पाचे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे या प्रमुख मागणीसाठी शनिवारी (दि. 5 डिसेंबर) तेल्हारा येथे युवाशक्तीने आक्रोश मोर्चा काढला. टावर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत युवाशक्ती संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हा मोर्चा तेल्हारा तहसील कार्यालावर पोहोचल्यानंतर तिथे उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेत निवेदन स्वीकारले. सात दिवसाच्या आत सर्व मागण्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवाशक्ती संघटनेने दिला आहे. यावेळी तेल्हारा हिवरखेड पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
- या आहेत मागण्या
- खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी द्यावा
- पीक विम्याचा लाभ घ्यावा
- तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा
- रस्त्याची दुरुस्ती करावी
हेही वाचा - धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी द्या; वारकऱ्यांची शासनाकडे मागणी