अकोला - तेलंगाणा येथील चाळीस मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उगवा, उगवा फाटा येथे काम करणारे मजूर टाळेबंदीनंतर गावी जाण्यासाठी निघाले होते. हे मजूर कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात थांबलेले आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांकडून जेवणाची व धान्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यांना घरी जाण्याची आस लागलेले आहे आहे. शासनाने त्यांना घरी जाऊ देण्यासाठी मदत करावी, अन्यथा ते गावाला जाण्यासाठी पायी निघू, असा इशारा या मजुरांनी दिला आहे.
उगवा फाटा येथे रेल्वे लाईनचे काम करण्यासाठी तेलंगाणा येथील 40 मजूर आलेले आहेत त्यांच्यासह लहान मुलेही आहेत. संचारबंदी लागल्यानंतर त्यांना गावी जाण्याची आस लागली आहे. काम बंद असल्यामुळे ते गावी जाण्यासाठी निघाले होते. पण, ते कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणात सध्या थांबले आहेत. त्यांच्याकडे जेवणाची व राहण्याची व्यवस्था नसली तरीही काही नागरिक, सामाजिक संस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. मात्र, त्यांना गावी जाण्याची ओढ लागली आहे. शासनाने त्यांना गावी जाण्यासाठी मदत करावी, अन्यथा सगळे मजूर पायी तेलंगाणा गाठू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईन