ETV Bharat / state

विमा कंपनीने अडथळे आणल्यास काय कराल; केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांचा कृषी अधीक्षकाला सवाल

author img

By

Published : Nov 9, 2019, 2:50 PM IST

जर, विमा कंपन्यांनी काही अडथळे आणले तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न केंद्रीय मानव संसाधन विकास, कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला कृषी अधीक्षक वाघ यांना विचारला. मात्र, वाघ यांनी धोत्रे यांच्या प्रश्नाला गुळमुळीत उत्तर दिले.

आढावा बैठक घेताना कंद्रीय मंत्री संजय धोत्रे

अकोला- अवकाळी पावसामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात पिकांचे झालेले नुकसान पाहता प्रशासनाच्या वतीने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. जर, विमा कंपन्यांनी काही अडथळे आणले तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न केंद्रीय मानव संसाधन विकास, कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला कृषी अधीक्षक वाघ यांना विचारला. मात्र वाघ यांनी धोत्रे यांच्या प्रश्नाला गुळमुळीत उत्तर दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत देण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये केंद्रीय मानव संसाधन विकास, कॉम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील संपूर्ण पीक नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला.

पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांद्वारे गत ३० ऑक्टोबरपासून सुरू आहे. पंचनामे करण्याचे काम अंतिम झाले असून यासर्व बाबींचा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आढावा घेऊन प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण ३ लाख ८५ हजार ७०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून एकूण २ लाख ६८ हजार ५२६ शेतकऱ्यांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. यावेळी आढावा बैठकीला विधानपरिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

हेही वाचा- शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा..! सेनेच्या नगरसेवकांनी केले सपत्नीक होम हवन

Intro:अकोला - अवकाळी पावसामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात पिकांचे झालेले नुकसान पाहता प्रशासनच्या वतीने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. जर विमा कंपन्यानी जर काही अडथळे आणले तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न केंद्रीय मानव संसाधन विकास, कॉम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला कृषी अधीक्षक वाघ यांना विचारला. त्यांनी मात्र गुळमुळीत उत्तर दिले.Body:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत देण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्रीय मानव संसाधन विकास, कॉम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील संपूर्ण पीक नुकसान बाबत आढावा घेण्यात आला.
पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्हयात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांद्वारे गत ३० ऑक्टोबरपासून सुरू असून पंचनामे करण्याचे काम अंतिम झाले असून यासर्व बाबींचा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आढावा घेऊन प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
अकोला जिल्ह्यात एकूण 3 लाख 85 हजार 703 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून जिल्ह्यातील एकूण 2 लाख 68 हजार 526 शेतकऱ्यांनी 2 लाख 2 हजार 536 हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे.
यावेळी आढावा बैठकिला विधानपरिषद सदस्य गोपिकीसन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा,रणधीर सावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विभाग प्रमुख खांची उपस्थिती आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.