ETV Bharat / state

वान प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

author img

By

Published : Sep 21, 2019, 8:45 PM IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाचे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले असून, 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वान धरण

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे शनिवारी पहाटे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वान धरणाचे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले असून, 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वान धरण भरले. मेळघाटचे जंगल आणि लगतच्या परिसरातील पाणी वान धरणाला येऊन मिळते. काही दिवसांपूर्वी धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. मात्र, मागील 24 तासात वान धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणखी चार दरवाजे उघडण्यात आले.

हेही वाचा - अप्पर वर्धा तुडूंब, धरणाचे 9 दरवाजे उघडले

वान नदी काठच्या 17 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस पडल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी दिली.

Intro:अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरण हा शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून आज पहाटे चार दरवाजे उघडण्यात आले. 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. त्यामधून 7 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. Body:सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे वाण प्रकल्प भरले. या प्रकल्पमध्ये मेळघाट जंगलाचा परिसर तसेच इतर स्रोतानमधून पाणी साठा तयार होतो. गेल्या काही दिवस पूर्वी वान प्रकल्पमधून दोन गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला होता. गेल्या 24 तासात वान धरनामध्ये पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वान धरणाचे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. त्यामधून सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या 24 तासापासून संपूर्ण जिल्ह्यात 80 मिलीमिटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. वान प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या नदी काठच्या 17 गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, परत पाऊस पडल्यास या प्रकल्पात वाढ होणार असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी दिली.

बाईट - चिन्मय वाकोडे
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.