ETV Bharat / state

अकोल्यात 8 फुटी अजगराच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत, वन्य जीव रक्षकांमुळे अजगराचा वाचला जीव

अकोला येथील बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात महाकाय अजगर पकडण्यात आला. त्याला वन्यजीव रक्षकांनी पकडून जंगलात सोडून दिले. दरम्यान, यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे.

akola
अकोला
author img

By

Published : May 10, 2021, 10:24 PM IST

अकोला - बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात महाकाय अजगर पकडण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वन्यजीव रेस्क्यू पथक यांच्या पथकाने या अजगराला जीवदान दिले. ही घटना रविवारी घडली. वनविभागाच्या सूचनेनुसार या अजगराला सुरक्षित स्थळी त्याला नैसर्गिक परिसरात सोडण्यात आले.

बाळापुर तालुक्यातील बहादुरा गावातील दत्ता मेसरे गिरीष घाटे, शिवा माळी, पवण माळी, विवेक माळी यांना घर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आणि ओलसर व थँडावा असलेल्या स्थळी अजगर दिसले. या अजगराला पाहून ग्रामस्थ घाबरले. त्यांनी याबाबत मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे आणि वन्यजीव विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होवून अजगराला बघितले. बाळ काळणे, वनरक्षक गुडे, चालक यशपाल इंगोले व पवन भगत यांनी हा अजगर पकडला. नंतर ते अजगर जंगलात सोडून देण्यात आले.

अकोल्यात 8 फुटी अजगराला पकडला

अजगराची वैशिष्ट्य

अजगर हा विषारी नसतो. मात्र, त्याच्यात जबरदस्त ताकद असते. त्याचे दात अतिशय तिक्षण व दातांची संख्या खुप जास्त असल्याकारणाने विळखा मारून भक्ष पकडल्यास ते सहसा सुटत नाही. दुरवर, झाडावर अजगर आहे. ते माणसांवर हल्ला करत नाही. भारतीय अजगराची लांबी 20 फुटापर्यंत आहे. मात्र, अकोला जिल्हात आजपर्यंत पकडलेल्या अजगराची लांबी ही 6 ते 14 फुट मिळून आली आहे. हा अजगर 8 फुट होता. हा त्याच्या तोंडाच्या आकाराच्या मोठ्या भक्षाला सहज खातो. पिकांची नासाडी करणारे प्राणी याचे प्रमुख भक्ष आहेत. नैसर्गिक वन्यजिव नियंत्रणाची भूमिका हा प्राणी निभावतो.

हेही वाचा - गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार

हेही वाचा - वेब सिरिज, शारीरिक संबंध, बलात्काराचा गुन्हा, अशी आहे ठाण्यातील "हनी ट्रॅप"ची कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.