ETV Bharat / state

लॉकडाऊनचा निषेध, 'वंचित'कडून जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर राखीचे दुकान

author img

By

Published : Aug 2, 2020, 7:58 PM IST

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऐन रक्षाबंधनच्या एक दिवस आधी सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले.

अकोला
अकोला

अकोला - रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन अमान्य करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर राखीचे दुकान लावून जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनचा निषेध केला.

वैद्यकीय सुविधा फक्त सुरू होणार होत्या. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. संचारबंदी तोडणार असे वंचित बहुजन आघाडीने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी काही व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची विनंती केली. काही व्यापाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर राखीचे दुकान लावून संचारबंदीचा निषेध केला.

व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दादागिरी करीत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचे तसेच दंड लावत असल्याचे समजले; या विरोधात प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान, राजेश तायडे, सचिन शिराळे, उमेश गोपणारायण, अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे, अनवर शेरा, आकाश गवई यांनी अभिनव आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.