अकोला - महानगरातील रस्ते बांधणी दर्जाच्या सोशल ऑडिटला भाजपने केराची टोपली दाखवली आहे. रस्त्यांची कामे दर्जाहीन सुरू असल्याच्या विरोधात 'वंचित बहुजन आघाडी'ने स्कायलार्क हॉटेल समोरील सिमेंट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांत 'कमळा'ची फुले लावून भाजपचा निषेध केला. तसेच सोशल ऑडिटवर कार्यवाही करण्याचे आणि रस्ते बांधकाम दर्जेदार करण्याची मागणी केली.
हेही वाचा - सत्ताधारी शिवसेनेनेच ठोकले जलयप्रदाय विभागाला कुलूप; अकोला मनपातील अजब कारभार
महानगरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करुन बांधकाम करण्यात आले आहे. या रस्त्यांवर वर्षभराच्या आतच मोठे खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचितने केला.
सध्या शहरात सुरू असलेले सिमेंट रस्तेही दर्जाहीन असल्याने या रस्त्यांचे काम पूर्ण होण्याआधीच तपासणी करून, काम चांगल्या प्रतीचे व्हावे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी वंचितने केली.
हेही वाचा - अकोल्यात पाच हजारांची लाच मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात व प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिनकर वाघ, प्रभाताई शिरसाट, सम्राट सुरवाडे, शोभाताई शेळके, सागर कढोणे, आकाश शिरसाट, शेख साबिर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, संतोष गवई आदी उपस्थित होते.