अकोला : अकोल्यात वंचित बहुजन युवक आघाडीने 'भीक मागो आंदोलन' ( Bhik Mango Andolan In Akola ) केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भामध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन होते. या आंदोलनातून गोळा होणाऱ्या रकमेतून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. फतेह चौक ते खुले नाट्यगृह चौक, गांधी रोड चौक या परिसरामध्ये वंचित युवक आघाडीने हे आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यालयासमोर ही त्यांनी जोरदार नारेबाजी केली.
भिक मागो आंदोलन : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसाआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत असताना वंचित बहुजन युवक आघाडीने यासंदर्भामध्ये 'भिक मांगो आंदोलन' केले. चंद्रकांत पाटील हे मानसिक रुग्ण झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. या रकमेतून जमा झालेली रक्कम ही चंद्रकांत पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने : वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या आंदोलन सुरू असताना ते भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर आले होते. यावेळी त्यांनी जोरदार नारबाजी केली. तसेच चंद्रकांत पाटील यांचा निषेधही व्यक्त केला. दरम्यान, भाजप कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी मागितली एक रुपयांची भीक : वंचित बहुजन आघाडीने केलेल्या भिक मागवा आंदोलनामध्ये त्यांनी एक रुपयाची भीक नागरिकांना व व्यापाऱ्यांना मागितली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नागरिकांना सांगितले.