अकोला- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या मौजा अडगाव शिवारात रानटी डुकराच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्बसह दोघांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना वनकोठडी मिळाली आहे.
मौजा अडगाव शिवारात रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने जिवंत गावठी बॉम्ब लावण्यात आल्याची माहिती अकोट वन विभागाच्या गस्ती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने २४ गावठी बॉम्ब शोधून काढले व तेजपालसिंग करतारसिंग जुनी आणि किरपालससिंग तुतूसिंग बाबरला अटक केली.
दोघांना अकोला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघांवर वनगुन्हा क्र. २१/२०१८ नुसार भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, २७ सह इतर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एक रानटी डुक्कर बॉम्ब खाल्ल्याने मृत झाला आहे. त्यास अडगाव येथील पशुधन विकास अधिकारी मार्फत शवविच्छेदन करून नियमानुसार कार्यवाही केली आहे. ही कारवाई फिरते वनपरिक्षेत्र पथक एस. एस. सिरसाट, अकोट वन परिमंडळ अधिकारी अजय बावणे, वन कर्मचारी एस. जी. जोंधळे, डी. ए. सुरजूसे, जी. पी. घुळे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मेंढे, वनमजूर राहुल यांनी केली आहे.
हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन