अकोला - कोरोना विषाणूबाबत आज अकोलेकरांना चांगली बातमी मिळाली आहे. 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. कोरोना रुग्णांपेक्षा यावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आली आहे. तर आजच्या अहवालातून दिवसभरात 12 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत. ते अकोट फैल, गायत्रीनगर, सिटी कोतवाली, मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत. दरम्यान, आज दुपारनंतर ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३० जण संस्थागत अलगीकरणात, तर पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल -१२३
पॉझिटीव्ह -१२
निगेटीव्ह -१११
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ५७०
मृत - ३० (२९+१)
डिस्चार्ज - ४२३
दाखल रुग्ण - ११७