ETV Bharat / state

शेगाव-अकोट रोडवर कापसाने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर

author img

By

Published : Dec 2, 2020, 9:00 PM IST

समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टाटा 407 ट्रकची धडक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

accident
अपघात

अकोला - समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टाटा 407 ट्रकची धडक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी तेल्हारा तालुक्यातील आडसूळ नजीक शेगाव अकोट रोडवर हा अपघात झाला.

तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

अकोट येथील कापसाने भरलेला मिनी ट्रक टाटा 407 (क्रमांक एमएच - 04 - जीसी - 9420) हा अकोटकडे जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणारी (एमएच 28 एव्ही 3288) हिरो डीलक्स या गाडीला धडक देऊन ट्रक पलटी झाला. दुचाकी चालक प्रल्हाद किसन अडकणे, तर मिनी ट्रकमधील जमीर शहा शब्बीर शहा, शेख मोबीन शेख इमाम असे तिघे जागेवरच ठार झाले. तर अरुण डांगे व गणेश अगळते हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तेल्हारा पोलीस घटनास्थळी -

घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरता तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था काहीकाळ खोळंबली होती. अपघातात मिनीट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'शरद पवार इज अ पॉवर'; एकनाथ खडसेंनी उधळली स्तुतीसुमने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.