अकोला - अकोला शहर वाहतूक शाखेने फटाके फोडणाऱ्या बुलेटवर कारवाई करीत त्याचे सायलेन्सर जप्त केले आहेत. यानंतर हे सायलेन्सर परत न देता ते वरिष्ठांची परवानगी घेत न्यायालयाच्या आदेशाने हे 45च्या वर सायलेन्सर रोडरोलरखाली नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहर वाहतूक शाखेची ही पहिलीच कारवाई आहे. अशी कारवाई आतापर्यंत कुठे झाली नसल्याची माहिती आहे.
शहरात काही तरुण बुलेटवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावून फटाके फोडत होते. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांनी ते सायलेन्सर ही काढून टाकले. हे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले.हे सायलेन्सर परत करण्याऐवजी पोलिसांनी ते बुलेटचालकास परत केले नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी तसेच न्यायालयाची परवानगी घेत शहर वाहतूक शाखेने हे सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट केले. या कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - एक महिन्यापासून जायकवाडी धरणाचा वीज पुरवठा खंडित
बुलेट जप्त
शहरात वाहतूक शाखेने फटाके फोडणाऱ्या बुलेट जप्त केल्या. त्यानंतर त्या बुलेटचे सायलेन्सर काढून ते जप्त करण्यात आले. हे सायलेन्सर काढले अथवा जप्त केले नसते तर बुलेटला राहिले असते आणि बुलेटचालकांनी परत फटाके फोडले असते. म्हणून शहर वाहतूक शाखेने सायलेन्सर काढून ते रोडरोलर खाली नष्ट केले.
हेही वाचा - कल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी 593 कोरोना रुग्णांची भर, लसीचा मात्र तुडवडा
नवीन बुलेटला लावले जाते फटाके फोडणारे सायलेन्सर
नविन बुलेट घेतली की त्याला असलेले नवीन सायलेन्सर काढून त्या जागी चार ते पाच हजार रुपयांचे फटाके फोडणारे सायलेन्सर लावले जाते. बुलेट रेस केल्यानंतर लगेच अक्सीलेटर त्याच वेगाने जागेवर आणल्यास फटाक्यांचा आवाज होतो. हा आवाज कर्कश असतो. त्यामुळेच शहर वाहतूक शाखेने ही कारवाई राबविली आहे.