अकोला - हिवरखेड जवळच्या चितलवाडी गाव परिसरातील एका कोरड्या विहिरीत बिबट्या पडला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान, बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
हिवरखेड नजीक असलेल्या चितलवाडी शेत शिवारात नागोराव पात्रीकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत रात्रीच्या अंधारात बिबट्या पडला. याची माहिती गावासह परिसरातील नागरिकांना कळाली. तेव्हा नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. चितलवाडीचे उप-सरपंच शिवाजी मेतकर यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली.
बिबट्या शिकार किंवा पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हिवरखेड हे गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जवळ असल्याने येथे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा - दिलासादायक! अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी १२ जणांची कोरोनावर मात
हेही वाचा - व्हिडिओ : बच्चु कडूंच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेनमेंट झोनमध्ये जाण्यास केली होती मनाई