अकोला - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बाळापुर हद्दीतील अंजुमन मार्केट येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापा टाकला. या पथकाने 17 जणांवर कारवाई करत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष पथकाने केलेल्या कारवाईत संघपाल तायडे, कुंदन निंबाळकर, रमेश कनेरकर, आतीकशाह हबीबशाह, अनीस अहमद गुलाम युनुस, दिलावर खान राशद खान, शेख गफार शेख जाफर, दिनेश खंडारे, शेख रहीम शेख बिसमिल्ला, चंदु उमाळे, अब्दुल निसार अब्दुल सत्तार, गुलाम जाबीर गुलाम रसुल, शेख बिसमिल्ला शेख फयान कुरेशी, शेख अब्दुल मो.हनीफ, सय्यद इब्राहीम सय्यद इस्माईल, शेख मतील शेख फरीद, मोहम्मद सलीम अब्दुल रहेमान यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - सत्ता संघर्ष दिल्लीत प्रलंबित, नागपुरात मात्र हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात
त्यांच्याकडून रोख 17 हजार 330 रुपये आणि एक लाख किंमतीच्या दोन दुचाकी, 33 हजार रुपये किंमतीचे 15 मोबाईल असा एकूण एक लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या सतरा जणांना बाळापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.