ETV Bharat / state

महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेने टाकली घाण, नालेसफाई न केल्याने केले आंदोलन - अकोला जिल्हा बातमी

पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे न झाल्याने शिवसेनेने आज दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावच नाल्यातील घाण टाकून पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:33 PM IST

अकोला - पावसाळ्यापूर्वी नाली सफाईची कामे न झाल्याने शिवसेनेने आज (दि. 10 जून) दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच नाल्यातील घाण टाकून महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी महापालिका प्रशासन व पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिकेकडून नाली सफाईची कामे केली जातात. पण, यावर्षी ही कामे झाली नाही. कागदावरच कामे झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. गटारी तुडुंब वाहू लागल्या होत्या. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तर न्यु तापडिया नगरातील नाल्याला पूर आला. यामुळे तेथील नागरिकांना रात्रभर अडकून राहावे लागले होते.

बुधवारी (दि. 9 जून) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत याच मुद्द्यांवर सभा गाजली. मात्र, पालिका प्रशासन आणि भाजप सत्ताधाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी याबाबत सभेत प्रश्न उपस्थित केला. मात्र, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिवसेनेने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नाल्यातील घाण आणि नदीतील जलकुंभी टाकून अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - अकोला येथील तेल्हाऱ्यात गादीचे दुकान जळून खाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.