ETV Bharat / state

आता ग्रामपंचायतच उभारणार कोविड सेंटर; वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार

राज्यासह अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड आणि प्राथमिक उपचार मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यासोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता गावकऱ्यांनीच पुढाकार घेत आपल्या गावातच कोविड सेंटर उभारावे अशी संकल्पना शिर्ला ग्रामपंचायतने मांडली आहे.

shirla village open covid care center
shirla village open covid care center
author img

By

Published : May 14, 2021, 7:06 PM IST

Updated : May 14, 2021, 7:23 PM IST

अकोला - राज्यासह अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड आणि प्राथमिक उपचार मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यासोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता गावकऱ्यांनीच पुढाकार घेत आपल्या गावातच कोविड सेंटर उभारावे अशी संकल्पना शिर्ला ग्रामपंचायतने मांडली आहे. ती सत्यात उतरवण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेतला. हा राज्यातील पहिला प्रयोग ठरणार आहे.

आता ग्रामपंचायतच उभारणार कोविड सेंटर

अकोला जिल्ह्यातील शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वप्रथम सात रुग्ण निघाले होते. त्यानंतर ही संख्या पाचशे ते सहाशे पेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह निघाले होते. सध्या 75 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे. रुग्णसंख्या लवकर आटोक्यात यावी. यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या ऑनलाईन मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य निर्भय पोहरे यांनी शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना तातडीने सुविधा मिळाव्या, यासाठी शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, यासाठी प्रस्ताव मांडला.

प्रस्तावाला ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे, उपसरपंच कल्पना ज्ञानेश्वर खर्डे, ग्रामपंचायत सदस्य रेखाताई गवई, मनोहर पातूरे, सय्यद इरफान सागर कढोणे, सुरेखा वसतकार, राजिक शाह, मंगल डोंगरे, वैशाली गावंडे, किरण येनकर, पूजा इंगळे सर्व उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठरावाला मंजुरी दिली. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत 16 लाख 71 हजार रुपये निधीची तरतूद शिर्ला ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटरसाठी केली आहे. ही तरतूद कृती आराखड्यामध्ये नसल्यामुळे त्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आराखडा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे.

संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे नागरिक सर्वत्र मृत्युमुखी पडत आहेत. अकोल्यात रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव वाचवणे शक्य होत नाही. त्यामुळे गावातच कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी विनंती सभेला केली. सर्वांनी त्याला मान्यता दिली. सभेने मांडलेल्या प्रस्तावाला तत्व: मंजुरी दिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच कोविड केअर सेंटर अस्तित्वात आणणे शक्य होणार आहे.

शिर्ला ग्रामपंचायतीच्या सेवालाल भवन येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्रथमोपचारसह अत्याधुनिक बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन शिर्ला ग्रामपंचायतीने केले. लवकरच या गावात कोविड सेंटर होईलच असंच प्रत्येक गावातील ग्रामपंचायतने अशा प्रकारचे ठराव घेऊन कोविड सेंटर उभारल्यास कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्याची स्वतंत्र यंत्रणा तयार होईल.

Last Updated : May 14, 2021, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.