ETV Bharat / state

परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील पिकांना फटका; शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आस

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत.

जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका
author img

By

Published : Oct 31, 2019, 3:16 PM IST

Updated : Oct 31, 2019, 8:04 PM IST

अकोला - परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. अंदाजे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील पिकांना फटका

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ठाण मांडले आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. कापून गंजी लावलेल्या पिकांबरोबरच उभ्या पिकांनाही कोंब फुटले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याचे पार कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे.

जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सर्वच राजकीय पक्षांनी पंचनामे करून अहवाल तयार करण्याची मागणी केली असून नवनिर्वाचित आमदारांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा एकूण घेतली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचनामे तयार करण्यासाठी शेतकरी संबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेत आहेत.

सोयाबीनला फुटले कोंब

परतीच्या पावसाने उभ्या सोयाबीनला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसात सोयाबीनच्या शेंगा ओल्या झाल्याने तिला कोंब फुटले आहे. त्यामुळे हे सोयाबीन विकणे योग्य नसून ते काळे पडण्याच्या स्थितीत आहे. अशा सोयाबीनमधून शेतकऱ्यांना एक दमडीही मिळणार नसल्याची स्थिती आहे.

कापसातूनही उत्पन्न कमीच

या ८ दिवसाच्या पावसामुळे परतीला आलेली बोंडे फुटली असून त्यातील कापूस ओला झाला आहे. बऱ्याच ठिकाणी कापसाचे बोंड काळे पडले असल्याने ते निरुपयोगी झाले आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः पावसामुळे कापूस बोंड्यांसहीत खाली पडले आहे. त्यामुळे गळलेल्या कापसाला वेचून काहीही मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

खराब पीक काढण्यासाठी लागणार खर्च

शेतात असलेले सोयाबीन, कापूस, हायब्रीडसह आदी पिके काढण्यासाठी खर्च लागत असतो. हा खर्च पीके विकल्यानंतर झालेल्या नफ्यातून निघून जातो. परंतु, आठ दिवसांपासून पडलेल्या पावसाने शेतातील सर्वच्या सर्व पिके खराब झाली आहेत. उभे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च लागणार आहे. परंतु, ते काढल्यानंतर त्याची परतफेड कुठल्या स्वरुपात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा- अकोल्यातील नवनिर्वाचित आमदारांची शेतात धाव; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Intro:अकोला - परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. अंदाजे साडेतीन लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. Body:मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ठाण मांडले आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. कापून गंजी लावलेल्या पिकांबरोबरच उभ्या पिकांनाही कोम फुटले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. शेतीच नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याचं पार कंबरडं मोडलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतलाय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी पिकांचं नुकसान झालं आहे. शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, सर्वच राजकीय पक्षांनी पंचनामे करून अहवाल तयार करण्याची मागणी केली असून नवनिर्वाचित आमदारांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा एकूण घेतली. तर जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचनामे तयार करण्यासाठी शेतकरी संबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेत आहेत.

सोयाबीन ला फुटले कोंब
परतीच्या पावसामुळे उभ्या सोयाबीनला चांगलीच जोडले आहे या पावसात सोयाबीनच्या शेंगा ओला झाल्याने तिला कॉम फुटले आहे त्यामुळे हे सोयाबीन विकणे योग्य नसून काही सोयाबीन झाल्यामुळे ते काळे पडण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे हिरवेगार दिसणारे सोयाबीन आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या सोयाबीन मधून शेतकऱ्यांना एक दमडीही मिळणार नसल्याची स्थिती आहे

कापसातून ही उत्पन्न कमीच
या आठ दिवसांच्या पावसामुळे परतीला आलेली बोंडे फुटली असून त्यातील कापूस ओला झाला आहे बऱ्याच ठिकाणी कापसाचे बोंड काळे पडले असल्याने ते निरुपयोगी झाले आहे काही ठिकाणी तर अक्षरशः पावसामुळे कापूस बोंडे सहित खाली पडला आहे त्यामुळे गळलेल्या कापसाला वेचून काहीही मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक एक सणसणीत सापडला आहे

खराब पीक काढण्यासाठी लागणार खर्च
शेतात असलेले सोयाबीन कापूस हायब्रीड सहादि पिके काढण्यासाठी खर्च लागत असतो हा खर्च हे पीक विकण्या नंतर झालेल्या नफ्यातून निघून जातो परंतु आठ दिवसापासून पडलेल्या पावसाने शेतातील सर्वच सर्व पिके खराब झाले आहेत उभे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च लागणार आहे परंतु ते काढल्यानंतर त्याची परतफेड कुठल्या स्वरूपात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

Byte : मिथुन काळे, शेतकरी, तामसी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला

Byte : हिरामण झाम्बरे
शेतकरी, सोमठाणा, ता. अकोला (सोबत - 121)

Byte : प्रा. संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

पॅकेज स्टोरी साठी मजकूर, श्री जोशी सर यांच्या आदेशानुसार पाठवीत आहे

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.