ETV Bharat / state

कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; अंत्यसंस्कारास मुलांचा नकार, मुस्लीम बांधवांनी दिला मुखाग्नी - अंत्यसंस्कार करण्यास मुलांचा नकार

अकोल्यात वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही वार्ता आरोग्य विभागाकडून त्यांच्या मुलांना सांगण्यात आली. त्यावेळी त्यांनी मृत वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात असमर्थता दर्शवत रुग्णालयातून काढता पाय घेतला.

funeral
कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; अंत्यसंस्कारास मुलांचा नकार, मुस्लीम बांधवांनी दिला मुखाग्नी
author img

By

Published : May 27, 2020, 12:06 PM IST

Updated : May 27, 2020, 2:34 PM IST

अकोला - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण जग एक होऊन काम करत आहे. तर दुसरीकडे अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. चक्क कोरोनाच्या भीतीने मुलाने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पाठ फिरवली आहे. त्यानंतर मुस्लीम बांधवांकडून हिंदू संस्कृतीनुसार मृत वडिलांना मुखाग्नी देण्यात आला. हिंदू पद्धतीने या मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

funeral
कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; अंत्यसंस्कारास मुलांचा नकार, मुस्लीम बांधवांनी दिला मुखाग्नी

कोरोनाने नातेसंबंध तोडण्याचा प्रकारही केलेला असल्याचे अनेक मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांना न स्वीकारल्यावर दिसून येते. जन्मदात्या आईबापांना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या पाल्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अशा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. हा प्रकार जगभरात सुरू आहे. बऱ्याच नातेवाईकांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत राहून त्यांचे अंतिमसंस्कारही केल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत.

अकोल्यात ही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मुलांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी त्या मुलांनी मृत वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात असमर्थता दर्शवत रुग्णालयातून काढता पाय घेतला. मात्र, माणुसकीच्या नात्याने मुस्लीम बांधवांनी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. वसिम खान समीर खान या मुस्लीम युवकांने पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुलाने वडिलांचे अंत्यदर्शनदेखील घेतले नसल्याचे महापालिकेचे प्रशांत राजुरकर यांनी सांगितले.

Last Updated : May 27, 2020, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.