ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत - शेतकरी चिंताग्रस्त

जिल्ह्यातील काही भागात जवळपास तासभर पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

rain in akola district
पावसाची हजेरी
author img

By

Published : Dec 26, 2019, 2:48 AM IST

अकोला - जिल्ह्यात सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुघवारी रात्री पावसाने हजेरी लावली. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मध्यम स्वरूपाच्या पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागाने दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. बुधवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांचे पुन्हा नुकसान होणार आहे. खरीप हंगामातील पिके देखील पावसामुळे खराब झाली. रब्बी हंगामातील पीकांमुळे आर्थिक बजेट सुधारेल या आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसाच्या माऱ्यानं रब्बीतील पीक सुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहेत. या पावसामुळे हरभरा, गहू आणि फळबागांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Intro:अकोला - सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर पावसाने आज रात्री सव्वाअकराच्या दरम्यान हजेरी लावली. मध्यम स्वरूपाच्या पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी आता पुन्हा चिंतातुर झाला आहे.

Body:हवामान विभागाने दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आजची पहाट हि ढगाळ वातावरणाने सुरु झाली. दिवसभर ओलसर थंडावा जाणवत होता. पावसाने गडद ढगाळ असतानाही हजेरी लावली नाही. अशीच परिस्थिती रात्री येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, मध्यम स्वरूपाच्या पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने परत पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव करून दिला. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांना नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असतानाच पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिक पुन्हा खराब होण्याची शास्वती शेतकऱ्यांमध्ये आली आहे. ज्याप्रमाणे शेवटच्या पावसाने सोयाबीन, मूग, कापूस खराब केले होते. त्याच प्रमाणे या अवकाळी पावसाच्या हजेरीने तूर आणि हरभरा हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.