ETV Bharat / state

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रँगिंग; 3 विद्यार्थिनींना 25 हजारांचा दंड

उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवारी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला.

Ragging in government medical college akola
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रँगिंग प्रकरण
author img

By

Published : Dec 13, 2019, 3:04 PM IST

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती आणि स्त्री रोगशास्त्र विभागातील रॅगिंग प्रकरणी गुरुवारी तिन्ही आरोपी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या अहवालात तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली आहे. तर या प्रकरणाबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवारी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. त्यानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला केलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत. मात्र, कामाच्या वेळी झालेल्या वादातून तिला मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर पीडित विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दखल हेण्याची समज तिन्ही विद्यार्थिनींना देण्यात आली.

हेही वाचा - घृणास्पद..! वर्षभर 'तो' करत होता मुलीवर लैंगिक अत्याचार, आई देत होती नराधमाला साथ

रॅगिंग झालीच नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रारकर्ता विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान, विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची तक्रार पालक व पीडित विद्यार्थिनीने तत्कालीन अधिष्ठाता यांच्याकडे केली होती. त्यावेळी हे प्रकरण आपसात मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसातदेखील तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अहवालानुसार रॅगिंग झालीच नाही तर तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

Intro:अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती व स्त्री रोगशास्त्र विभागातील रॅगिंग प्रकरणी गुरुवारी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अहवालानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही आरोप असलेल्या विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, या अहवालात तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांला मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणाबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. Body:उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. त्यानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला केलेले आरोप सिद्ध करता आले नाही; परंतु कामाच्या वेळी झालेल्या वादातून तिला मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर पीडित विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही समज तिन्ही विद्यार्थिनींना देण्यात आला.

रॅगिंग झालीच नाही?
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रारकर्ता विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान, विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची तक्रार पालक व पीडित विद्यार्थिनीने तत्कालीन अधिष्ठाता यांच्याकडे केली होती. त्यावेळी हे प्रकरण आपसात मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु अहवालानुसार रॅगिंग झालीच नाही, तर तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.