अकोला - मुबई येथे नोंदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमर जवान माजी सैनिक संघटनेद्वारे शनिवारी कर्ता हनुमान मंडळ येथे निषेध बैठक घेण्यात आली. या घटनेचे अकोल्यात पडसाद उमटले आहेत.
मुंबई येथे नोंदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेध सभेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने होते. या बैठकीत निषेध नोंदवण्यात आला. ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. या देशात माजी सैनिकला ज्याने २४ वर्ष देश सेवा केली त्याच्यावरच हल्ला होत असेल तर बाकी जनतेचे काय? अशा आशयाचे निर्देशन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी विलास गासे, लक्ष्मण मोरे, शंकर देशमुख, संतोष चराटे, प्रकाश बाहेकर, रामेश्वर लांडगे, श्रीकृष्ण चक्रणारायण, वसंतराव खेडकर, सुरेश वढे, मुरिधर झटाले ,शांताराम काळे, आदी उपस्थित होते.