अकोला - हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या डॉक्टरच्या व्यवसायास दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी उघडकीस आणले. जवाहर नगरमधील जिमडी मार्केटजवळ हा प्रकार सुरु होता. दहशदवाद विरोधी पथकाने कारवाई करत एक महिला एक ग्राहक, तेथे काम करणारा व्यक्ती व व्यवस्थापकाला काल रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. अकोल्यातील गजबजलेल्या परिसरात ही रेड पडल्याने अकोला शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेल्थ केअर सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय-
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जवाहर नगर मधील तेजस्वी हेल्थ केअर सेंटर येथे रुग्णांना मसाज थेरपीद्वारे आराम मिळावा, या करिता डॉ. प्रदीप देशमुख यांनी व्यवसाय सुरू केला. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी ग्राहक देखील येत होते. परंतू, व्यवसाय हेल्थ केअर सेंटर नसून देहव्यापारचा अड्डा असेल याची थोडीशी कल्पना देखील कुणाला नव्हती. याच हेल्थ केअर सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती अकोला दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर पथकाने आपला सापळा रचून तेथे छापा टाकला.
पिडीत महिला ताब्यात-
या केंद्रातून डॉ. प्रदीप देशमुख यांच्यासोबत रिसोड तालुक्यातील चिंचाबा पेन येथील रहिवासी संतोष सानप आणि लहान उमरी महात्मा फुले चौक येथील रहिवासी रतन लोखंडे यांच्यासह पीडित महिलेला ताब्यात घेतले. एटीसीच्या तक्रारीवरून सिव्हील लाईल पोलीस ठाण्यात देह व्यापार अधिनियम १९५६ अंतर्गत ३,४,५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उप अधिक्षक सचिन कदम आणि पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या टीमने केली.
हेही वाचा- दिल्ली आंदोलनात हिंसाचार करणार असल्याचे वक्तव्य संशयीताने फिरवले