ETV Bharat / state

शेतकऱ्यांसाठी पाठिंबा म्हणजे दिखावा; प्रकाश आंबेडकर यांची राज्य सरकारवर टीका - प्रकाश आंबेडकर यांची राज्य सरकारवर टीका

शेतकरी समर्थनार्थ देशव्यापी बंदला महाविकास आघाडी सरकारने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 17, 2021, 12:51 AM IST

Updated : Oct 17, 2021, 1:27 AM IST

अकोला - गत आठवड्यात शेतकरी समर्थनार्थ देशव्यापी बंदला महाविकास आघाडी सरकारने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा होता. कृषी कायदे बनवण्याचे डोके कुणी दिले?, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. ओबीसींना उद्धस्त करण्याचा प्रयत्न सुरू असून, या मुद्दाची अभ्यासपूर्ण मांडणी करून लढ्यात उतरणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ॲड. आंबेकडर अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन महाेत्सवाअंतर्गत धम्म मेळाव्याला संबाेधित करीत हाेते.

बोलताना प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना नियमाचे पालन करीत मोजक्‍या दोनशे अनुयायांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला हाेता. ॲड. आंबेडकर यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांचा समाचार घेतला. ओबीसी नेते ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मंडळ आयाेगाच्या विरोधातील नेते आहेत. जेव्हा मंडळाचा लढा सुरू होता, तेव्हा ते कुणाबरोबर होते? असा सवाल करत ते केवळ शरीराने ओबीसींबरोबर आहेत, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळेच न्यायालयात व्यवस्थितरित्या बाजू मांडता आली नाही. २७ टक्के आरक्षण हा संसदेचा ठराव आहे. मात्र, हेही व्यवस्थित मांडता न आल्याने ओबीसींचे आरक्षण गेले. सध्या देशात ओबीसी आणि मागासवर्गीयांना डावलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असा घणाघात आंबेडकर यांनी केला. सभेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभाने केले होते. यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अन्य नेतेही उपस्थित हाेते.

देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर -

देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बाेलतांना म्हणाले. येणाऱ्या दाेन-तीन महिन्यात याच अनुषंगाने काही घटना घडतील, असेही सूचक विधान त्यांनी केले. सन २००५-०६ मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील कृषी कायद्यातील मसुदे व केंद्राच्या कायद्यातील तरतुदीसारख्याच आहेत. त्यामुळे कृषी कायद्याच्या विराेधातील बंदला काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.

पुढील १० वर्षे ओबींसीचा लढा -

मोदी म्हणजे हिटलरशाही; ते मुस्कटदाबी कशी करतात, ही अभ्यापूर्ण मांडणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेते- कार्यकर्त्यांनी सर्वांगाने अभ्यासकरणे, स्वत:कडील माहिती अद्यायावत ठेवणे, आवश्यक आहे. पुढील १० वर्षे ओबीसी लढ्यासाठी महत्त्वाचे आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत

Last Updated : Oct 17, 2021, 1:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.