ETV Bharat / state

अकोल्यात प्रतिबंधित स्टेरॉइड इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या दोन ठिकाणांवर छापेमारी - Food and Drug Administration

खोलेश्वर येथील सचिन ओमप्रकाश शर्मा यांचे सिव्हील लाईन्स रोडवर सनी हेल्थ एंटरप्रायजेस आहे. येथून तसेच त्यांच्या खोलेश्वर येथील निवास स्थानावरून जीममध्ये जाणाऱ्या युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी अवैधरीत्या व खुलेआम स्टेरॉइडचे इंजेक्शन विक्री होत असल्याची माहिती, विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे (रा. हरीहर पेठ) व स्वप्नील कैलास गाडेकर (रा. तुकाराम चौक) या तीन आरोपींना अटक केली.

सनी हेल्थ एंटरप्रायजेससह दोन ठिकाणावर छापेमारी
author img

By

Published : Aug 11, 2019, 3:19 AM IST

अकोला - आरोग्यासाठी घातक असलेल्या स्टेरॉइडच्या इंजेक्शनची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या तीघा जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे, स्वप्नील कैलास गाडेकर या तीघांना अटक केली.

सनी हेल्थ एंटरप्रायजेससह दोन ठिकाणांवर छापेमारी

खोलेश्वर येथील सचिन ओमप्रकाश शर्मा यांचे सिव्हील लाईन्स रोडवर सनी हेल्थ एंटरप्रायजेस आहे. येथून तसेच त्यांच्या खोलेश्वर येथील निवास स्थानावरून जीममध्ये जाणाऱ्या युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी अवैधरीत्या व खुलेआम स्टेरॉइडचे इंजेक्शन विक्री होत असल्याची माहिती, विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यानुसार बहाकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाचवेळी छापेमारी केली.

या छापेमारीत 1 लाख 43 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर या ठिकाणांवरुन सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे (रा. हरीहर पेठ) व स्वप्नील कैलास गाडेकर (रा. तुकाराम चौक) या तीन आरोपींना अटक करण्यात आली. यासोबतच आरोग्यास घातक असलेली काही औषधी व प्रोटीन सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. त्यांनतर या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालली. जिल्ह्यात आशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभाग या तीघा आरोपींच्या ग्राहकांना शोधणार असल्याचे समजते आहे.

या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर व इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येतात, तर युवकांची हाडे ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे, त्यांची जननेंद्रीय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Intro:अकोला - आरोग्यासाठी घातक असलेल्या स्टेरॉइडच्या इंजेक्शनची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हील लाईन्स रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणावरुन 1 लाख 43 हजार 180 हजार रुपयांचा आरोग्यास इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे, स्वप्नील कैलास गाडेकर या तीघांना अटक केली आहे. अकोल्यात आशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून या तिघांचे ग्राहक आता पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभाग शोधणार असल्याचे समजते.
Body:खोलेश्वर येथील सचिन ओमप्रकाश शर्मा याच्या मालकीचे सिव्हील लाईन्स रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाऱ्या युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवाणगी, अवैधरीत्या आणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याना सोबत घेउन सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाचवेळी छापेमारी केली. या छापेमारीत एक लाख 43 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे रा. हरीहर पेठ व स्वप्नील कैलास गाडेकर रा. तुकाराम चौक या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. यासोबतच आरोग्यास घातक असलेली काही औषधी व प्रोटीन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर व इतर अधिकारयांचा सहभाग होता. स्टेराइडच्या इंजेक्शनमूळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येतात, तर युवकांचे हाड ठीसुळ होणे, कीडणीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रीय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.