ETV Bharat / state

मोर्णा नदीतील जलकुंभींमुळे परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास; गंभीर आजाराची भीती

अकोल्यातील मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा नदीकाठच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या डासांमुळे साथीचे रोगांचे प्रमाण वाढले आहे.

अकोल्यातील मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे
author img

By

Published : Aug 13, 2019, 4:59 PM IST

अकोला - पावसाळा ऋतू सुरू असल्याने मोर्णा नदीकाठच्या नागरिकांना डासांचा त्रास वाढला आहे. मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महापालिकाचा आरोग्य विभाग यावर फॉगिंग मशीनने फवारणी करीत असल्याचा दावा करत आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी मनपाच्या या दाव्याला फोल ठरवले आहे. त्यामुळे महापालिका आता तरी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणार नाही, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

अकोल्यातील मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे
संपूर्ण शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. या डासांमुळे साथीचे रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे भयंकर आजार होतात. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत असतो. मात्र, बहुतेक वेळा या उपाययोजना कागदावरच राहतात. प्रत्यक्षात त्या अवलंबल्या जात नाहीत. परिणामी, नदीकाठच्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जर योग्य प्रकारे फॉगिंग मशीनची फवारणी केल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते. परंतु, महापालिकेचे कर्मचारी साफ-सफाईसाठी तर सोडाच फॅागिंग मशीनच्या फवारणीसाठीही येत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. फॉगिंग मशीन नदीकाठच्या वस्त्यांमध्ये नियमितपणे सायंकाळी फवारणी करत आहे. त्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित परिसरातील पाच नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आणणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही फवारणी होत असल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. फारुख शेख करत आहेत.

Intro:अकोला - पाऊस पडून दोन दिवस होत नाही तोच नदीकाठच्या नागरिकांना मच्छरांचा त्रास वाढला आहे. मोर्णा नदी मध्ये वाढलेल्या जलकुंभ देणे मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका आरोग्य विभाग फॉगिंग मशीनची फवारणी करीत असल्याचा दावा असला तरी परिसरातील नागरिकांनी मनपाच्या या दाव्याला फोल ठरवले आहे. त्यामुळे महापालिका आता तरी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणार नाही, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

Body:मोर्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलकुंभी वाढली आहे. या जलकुंभीमुळे मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे हे मच्छर परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात फिरत राहतात. या मच्छरामुळे साथीचे रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे भयंकर आजार होतात. या मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग विविध उपाययोजना करीत असते. परंतु बराच वेळ या उपाययोजना कागदावरच दिसून पडतात. प्रत्यक्षात मात्र त्या अवलंबल्या जात नाही. परिणामी, नदीकाठच्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जर योग्यप्रकारे फॉगिंग मशीन ची फवारणी केल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते. परंतु, महापालिकेचे कर्मचारी साफसफाईसाठी तर सोडाच फोगिंग मशीनच्या फवारणीसाठी ही येत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहे. तर दुसरीकडे मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. फारुख शेख हे फॉगिंग मशीन नदीकाठच्या वस्तीमध्ये नियमितपणे सायंकाळी फवारनी करीत असून त्यासाठी कामी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित परिसरातील पाच नागरिकांच्या स्वाक्षऱ्या तसेच येथील नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आणणे बंधनकारक असल्याने ही फवारणी होत असल्याचा दावा ते करीत आहे. महापालिका आरोग्य विभाग आणि नदीकाठच्या नागरिकांमधील दावे-प्रतिदावे यामुळे नुकसान सामान्य नागरिकांचे होत आहे, हे यावरून दिसून येते.

बाईट - रोहित बनसरे

बाईट - डॉ. फारुख शेख
मनपा आरोग्य अधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.