ETV Bharat / state

भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; प्रशासनाचे दुर्लक्ष तर, अकोलेकरांचीही डोळेझाक

author img

By

Published : Jun 21, 2020, 5:55 PM IST

अकोल्याची कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने सम-विषम पद्धतीने व्यवसाय करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी या सूचनांचे कुठलेच पालन केल्याचे दिसत नाही. तर, भाजी विक्रेत्यांनीही त्यांना नेमून दिलेल्या परिसरात व गल्लीमध्येच भाजीविक्री करावी लागणार असल्याच्या नियमांचाही फज्जा उडवला आहे.

भाजीबाजारात सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा

अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी संख्या ही चिंताजनक ठरत आहे. मात्र, त्याहुन अधिक चिंताजनक बाब म्हणजे सरकारने दिलेल्या नियमांचे शहरातील सार्वजनिक ठिकाणी कुठल्याच प्रकारचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील भाजीबाजारात आज(रविवार) पहाटे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. या गर्दीतील अनेक नागरिकांनी तोंडावर मास्कही नव्हते लावले. सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचा पूर्णपणे ते फज्जा उडाला. तसेच याठिकाणी प्रशासनाचा किंवा पोलीस कर्मचारीदेखील हजर नव्हता. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन अकोला येथील कोरोना रुग्ण वाढीसाठी पूरक ठरत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अकोल्याची कोरोना रुग्णांची संख्या बाराशेच्या जवळ पोहोचली आहे. दोन अंकाने वाढणारी रुग्णांची संख्या ही अकोलेकरांसाठी चिंताजनक बाब ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने सम-विषम पद्धतीने व्यवसाय करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी या सूचना कचऱ्याच्या पेटीत टाकून दिल्या असून कुठल्याच प्रकारचा आदेश त्यांनी पाळलेला नाही. त्यासोबतच भाजी विक्रेत्यांना एका ठिकाणी भाजी विक्री न करता त्यांना नेमून दिलेल्या परिसरात व गल्लीमध्येच भाजीविक्री करावी लागणार असल्याच्या नियमांचाही भाजी विक्रेत्यांनी फज्जा उडवला आहे.

तर, फळविक्रेते मात्र या सर्वांच्याही पुढे आहेत. सायंकाळचे पाच वाजले तरीही ते उशिरापर्यंत रस्त्यावर फळविक्री करत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागालाही कारवाई करू नये म्हणून ठेंगा दाखवत आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या नियमांच्या पालनाची जबाबदारी प्रशासनही घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. बाजारामध्ये पहाटे साडेतीन, चार वाजतापासून भाजीविक्रेत्यांची मोठी गर्दी असते. किरकोळ विक्रेत्यांसह सामान्य नागरिकही कमी भावात भाजी मिळत असल्यामुळे या ठिकाणी गर्दी करत आहेत. परंतु, गर्दी करताना आपल्या शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा भाव ते मनात ठेवून बाजारात उघडपणे फिरत आहेत.

गर्दी करणे, एकमेकांना हात लावणे, तोंडावर मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे यासारखी कृती करून ते कोरोनाला आमंत्रणच देत आहेत. विशेष म्हणजे, बाजारामध्ये महापालिकेचे किंवा पोलीस विभागाचे कोणीही कर्मचारी तेथे तैनात नसल्यामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.