अकोला - एनएसयुआयने पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महानगरात 'चहा ठेला' मांडून व चहा वितरित करून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला.
![nsui celebrates pm modi birthday is national unemployment day and distribute free tea in akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-01-nsui-celebrate-pm-birthday-7205458_17092020155859_1709f_1600338539_1083.jpg)
मोदी पंतप्रधान झाल्यापासून करोडो जनतेचे रोजगार गेले आहेत. सामन्य माणसाला त्यांच्या भाषणाशिवाय काही मिळत नसून सामान्य जनता हतबल झाली आहे. हाताला काम व पोटाला भाकर मिळत नाही. नोटाबंदीने देशाचे आर्थिक नुकसान झाले. अनेक शासकिय कंपण्याची विक्री करुन खासगीकरण करण्याचा डाव होत आहे. लाखो युवक बेरोजगार झाले असल्याची टीका एनएसयुआय कार्यकर्त्यांनी केली.
हा निषेधात्मक बेरोजगार दिन उपक्रम एनएसयूआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बेरोजगार दिनावर केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करत घोषणा दिल्या. यावेळी युवक काँग्रेसचे राहुल सारवान, अभिजित तंवर, ऋषिकेश जामोदे, अक्षय गडेकर, संतोष पलन, तेजेस देवभाले, अजय ठाकुर, महेश पाटिल, हर्ष ढोरे, सम्राट ठाकरे, सारंग शिंदे, ऋषभ जैन, विक्की बुन्देले, महेश झटाले समवेत एनएसयूआयचे बहुसंख्य कायकर्ते उपस्थित होते.