अकोला - जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 18 पैकी 11 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला.
11 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पाच महिला व सहा पुरुष आहेत. हरिहरपेठ येथील दोन आणि खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदौस कॉलनी, जुनेशहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री दोन रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक व्यक्ती 27 मे तर दुसरा व्यक्ती 26 मेला रुग्णालयात दाखल झाला होता.
प्राप्त अहवाल-१८
पॉझिटिव्ह-११
निगेटिव्ह-०७
अकोला कोरोना सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१
मृत-३२(३१+१),
डिस्चार्ज-४२३
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६