ETV Bharat / state

सावतराम मिल सुरू व्हावी यासाठी मिशन अकोला विकासने केले 'ध्यानाकर्षण' आंदोलन

शहरातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाबरोबरच इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी सायंकाळी शहरातील सावतराम मिलसमोर ‘मिशन अकोला विकास’ मोहिमेअंतर्गत ध्यानाकर्षण जनआंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील बंद पडलेली सावतराम मिल सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

‘मिशन अकोला विकास’ मोहिमेअंतर्गत ध्यानाकर्षण जनआंदोलन
author img

By

Published : Jul 4, 2019, 12:05 AM IST

अकोला - वाढत्या बरोजगारीला आटोक्यात आणण्यासाठी नविन उद्योग उभारणे, बंद झालेल्या मिलपैकी काहींना परत सुरू करून रोजगाराला चालना देणे. तसेच शहरातील इतर समस्यांच्या निराकरणासाठी बुधवारी सायंकाळी शहरातील सावतराम मिलसमोर ‘मिशन अकोला विकास’ मोहिमेअंतर्गत ध्यानाकर्षण जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील बंद असलेली सावतराम मिल पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

‘मिशन अकोला विकास’ मोहिमेअंतर्गत ध्यानाकर्षण जनआंदोलन

शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याची मोहीम 'मिशन अकोला विकास'ने हाती घेतली आहे. वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी शहरात नवीन उद्योग सुरू होणे काळाची गरज आहे. पूर्वी अकोला शहरात सावतराम मिल, मोहता मिल, बिर्ला डालडा फॅक्ट्री, निळकंठ सुत गिरणी यासारखे मोठ-मोठे उद्योग होते. पण आज शहरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बंद झालेल्या मिलपैकी सावतराम मिल व निळकंठ सुत गिरणी पुन्हा सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी सावतराम मिल समोर ‘मिशन अकोला विकास’ मोहीम अंतर्गत ध्यानाकर्षण आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 'मिशन अकोला विकास'चे समन्वयक मदन भरगड यांनी केले.

शहरात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. स्थानिक युवकांना रोजगार नसल्याने मोठ-मोठ्या शहरांची वाट धरावी लागत आहे. एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वात सुरू केलेले आंदोलन मर्यादितच राहते. म्हणूनच शहरातील समस्या सोडविण्यासाठी व स्थानिकांना त्यांच्या कर्मभूमीतच रोजगार मिळावा यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, हे आंदोलन कोणत्या एका व्यक्तीच्या नेतृत्वात नसून यामागे कोणतेही श्रेय लाटण्याचा उदेश नाही, असे मत भरगड यांनी व्यक्त केले. विविध मजूर, सामाजिक, व्यापारी, सांस्कृतिक, वैद्यकिय, शिक्षक, वरिष्ठ नागरीक, महिला, युवक सर्व संघटित होऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

ज्यावेळी “मोहता मिल” बंद करण्यात आली त्यावेळी सावतराम मिलचे नवीनीकरण करून पुढे सुरू ठेवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता झाली नाही व काही काळातच मिल बंद पडली. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. आज सावतराम मिल सुरू करण्यात कोणतीही अडचण नाही. येथे मुलभुत सुविधा असल्याने अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणल्यासही मिल सुरू होऊ शकते, असे मदन भरगड म्हणाले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:अकोला - शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याची मोहिम ‘मिशन अकोला विकासने’ हाती घेतली आहे. वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी शहरात नवीन उद्योग सुरू होणे काळाची गरज आहे. पुर्वी अकोला शहरात सावतराम मिल, मोहता मिल, बिर्ला डालडा फॅक्ट्री ,निळकंठ सुत गिरणी या सारखे मोठ मोठे उद्योग होते. यामुळे शहरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यापैकी सावतराम मिल व निळकंठ सुत गिरणी पुन्हा सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी आज सायंकाळी सावतराम मिल समोर ‘मिशन अकोला विकास’ मोहिम अंतर्गत ध्यानाकर्षण आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ‘मिशन अकोला विकासचे’ समन्वयक मदन भरगड यांनी केले.Body:शहरात बेरोजगारीचा प्रश्न एैरणीवर आहे. स्थानिक युवकांना रोजगार नसल्याने मोठ मोठया शहरांची वाट धरावी लागत आहे. एखादया व्यक्तीच्या नेतृत्वात सुरू केलेले आंदोलन मर्यादीतच राहते म्हणूनच शहरातील समस्या सोडविण्यासाठी व स्थानीकांना त्यांच्या कर्मभुमीतच रोजगार मिळावा यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत भरगड यांनी व्यक्त केले. म्हणूनच हे आंदोलन कोणत्या एका व्यक्तीच्या नेतृत्वात नसून कोणते हि श्रेय लाटण्याचा यामागे उदेश्य नाही. विविध मजूर, सामाजिक, व्यापारी, सांस्कृतिक, वैद्यकिय, शिक्षक, वरिष्ठ नागरीक, महिला, युवक, अशा संघटनाना आंदोलनात सहभागी झाले होते.
ज्यावेळी “मोहता मिल” बंद करण्यात आली त्यावेळी सावतराम मिलचे नवीनीकरण करून पुढे सुरू ठेवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासनाची पुर्तता झाली नाही व काही काळातच मिल बंद पडली. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. आज सावतराम मिल सुरू करण्यात कोणतीही अडचण नाही. येथे मुलभुत सुविधा असल्याने अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणल्यास ही मिल सुरू होवू शकते, असे मदन भरगड म्हणाले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. Conclusion:सूचना - सोबत बातमी आणि व्हिडीओ आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.