अकोला Minor Girl Rape Case : शहरातील एका गावगुंडानं एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न या गुंडानं केला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याला 21 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून सुरू होता अत्याचार : अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तेथील एका गावगुंडानं दोन वर्षांपासून लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न या गुंडानं केला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
मुलीला, वडिलांना धमक्या : या प्रकरणी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची फिर्याद घेऊन गेले असता फिर्याद लवकर घेतली गेली नाही, असा आरोप वडिलांनी केला आहे. म्हणून त्यांना नैतिक बळ आणि अभय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठलं. मुलीचा जबाब घेताना आरोपी गणेश कुमरे यानं पोलीस ठाण्यामध्ये मुलीला आणि तिच्या वडिलांना धमक्या दिल्याचा आरोप वंचित कडून करण्यात येत आहे. पीडित मुलीवर मागील दोन वर्षांपासून धाकदपटशा आणि धमक्या देऊन आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. तो 4 दिवस पोलीस कस्टडीत राहणार आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. --- अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला
आरोपीचं क्रौर्य : दोन दिवसांपूर्वी पीडितेच्या हाताला सिगारेटचे चटके देण्यात आले. तिचे केस कापून हा आरोपी थांबला नाही. तर तिला स्मशानभूमीत विवस्त्र करण्यात आलं अशी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा: