ETV Bharat / state

अकोल्यात मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा मोबाईल - पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

स्वत: मंत्री ठाकूरच उशिरा आल्याने पत्रकार हे पत्रकार परिषद सोडून जात होते. त्यावेळी मंत्री ठाकूर यांनी पत्रकारांची समजूत काढत असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी हा प्रकार कॅमेरामध्ये कैद केला. त्यावेळी मंत्री ठाकूर यांनी त्या पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेतला. यामुळे मंत्री ठाकूर यांचा श्रमिक पत्रकार संघाने निषेध करत पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

मंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : May 3, 2021, 4:58 PM IST

अकोला - अकोला दौऱ्यावर असलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत स्वत: मंत्री ठाकूरच उशिरा आल्याने पत्रकार हे पत्रकार परिषद सोडून जात होते. त्यावेळी मंत्री ठाकूर यांनी पत्रकारांची समजूत काढत असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी हा प्रकार कॅमेरामध्ये कैद केला. त्यावेळी मंत्री ठाकूर यांनी त्या पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेतला. यामुळे मंत्री ठाकूर यांचा श्रमिक पत्रकार संघाने निषेध करत पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा प्रकार घडला, हे विशेष.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा मोबाईल

यशोमती ठाकून यांनी व्यक्त केली दिलगिरी

अकोला दौऱ्यावर असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विविध विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेतली. या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषद दुपारी साडेबारा वाजता घेणार असल्याचा मेसेज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून आला होता. नियोजित वेळेच्या आधीच पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पोहोचले होते. एक तास होऊनही मंत्री यशोमती ठाकूर आल्या नाही. शेवटी पत्रकार हे निघून जात असताना मंत्री ठाकूर यांना मेसेज देण्यात आल्यानंतर त्या तत्काळ बाहेर आल्या आणि पत्रकार परिषदेला उशिर झाल्याबद्दल त्या दिलगिरी व्यक्त करीत असतानाच या सर्व प्रकाराचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश सोनोने हे काढत होते. यावेळी मंत्री ठाकूर यांनी लगेच त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून त्यामधील व्हिडिओ डिलीट केले. यामुळे पत्रकार आणि मंत्री ठाकूर यांच्यात वाद सुरू झाला. या घटनेचा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजय डांगे यांनी निषेध केला. तसेच पत्रकार परिषदेवर पत्रकार यांनी बहिष्कार केला. या प्रकारानंतर मंत्री यशोमती ठाकूर या जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेल्या.

हेही वाचा - कोरोनाबाधितांचे प्रमाण चार ते सहा आठवड्यांत कमी होईल-आयसीएमआर वैज्ञानिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.