अकोला : गेल्या पाच दिवसापूर्वी हवेतील उष्णता वाढल्यामुळे सहा डिसेंबर रोजी अकोल्याचे किमान तापमान 18.5 अंश सेल्सिअस एवढे होते. मात्र, या पाच दिवसांच्या अवधीनंतर अकोल्यातील तापमानामध्ये अचानक घट झाली आहे. आजचे किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस एवढे असल्याने जिल्ह्यात सर्वत्र हुडहुडी वाढली आहे. विशेष म्हणजे, या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाने कळविले. परिणामी, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आणि शहरातील अनेक ठिकाणी नागरिक सकाळी व सायंकाळी शेकोटी करून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत (Lowest temperature of winter in Akola) आहेत.
हिवाळ्याची चाहूल : यंदा पावसाळा लाबल्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर हिवाळ्याची चाहूल अकोलेकरांना अनुभवास मिळाली. अकोल्यातील तापमान हे हळूहळू कमी होत पुन्हा तापमानात वाढ झाली होती. परिणामी हे तापमान सहा डिसेंबर रोजी 18.6°c वर गेले होते. मात्र, या तापमानात पुन्हा घट झाली आहे. किमान तापमान 10.6°c वर आले (Five degrees Celsius drop in temperature) आहे.
सर्वात कमी तापमान : यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. तत्पूर्वी शुक्रवारी किमान तापमान यापेक्षा जास्त म्हणजेच 11.3 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. मात्र, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील तापमान यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वातावरणात थंडी हवा वाहत असल्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर दुपट्टा तसेच कान टोपी वापरण्यात येत असल्याचे चित्र असून स्वेटर आणि जॅकेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला (Lowest temperature in Akola) आहे.
थंडीपासून बचाव : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. हा वीज पुरवठा रात्री करण्यात येत असल्यामुळे त्या भागातील शेतकरी रात्री विजेची वाट पाहत शेकोटी करून आपली वेळ काढत आहे. वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ते शेतातील गहू आणि हरभऱ्याला पाणी दिल्यानंतर परत शेतात शेकोटी करून थंडीपासून बचाव करीत रात्र काढत असल्याचे चित्र आहे. तर अनेक गावांमध्ये आणि शहरातील अनेक भागांमध्ये नागरिक सकाळी व सायंकाळी शेकोटी करून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत (temperature of winter in Akola) आहे.