अकोला - येथील शासकीय मूकबधीर विद्यालयातील एका शिक्षिकेला ५ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सुनावली आहे. या विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा तिच्यावर आरोप होता. बालदिनाच्या आधी लागलेल्या या निकालामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - अकोल्यात महापौर पदासाठी महिला खुला प्रवर्गाची निघाली सोडत
शितल अवचार ही शिक्षका अकोल्यातील शासकीय मुकबधीर विद्यालयात नोकरी करत होती. येथील अल्पवयीन मुलांकडून ती अश्लील कृत्य करवून घेते, असा तिच्यावर आरोप होता. २०१३ साली ही घटना उघडकीस आली होती. संबंधीत पीडित मुलाने या प्रकरणाचा व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर ही बाब समोर आली.
हेही वाचा - ..म्हणून अकोल्यातील महापालिका आयुक्तांच्या दालनात फेकली घाण
यानंतर आरोपी शितलविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. सरकारकडून ९ साक्षीदारांची साक्ष तपासून आरोपी शिक्षिका शीतल अवचार हिला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राज्यात पोस्को कायद्याअंतर्गत एका महिलेला दोषी ठरवत शिक्षा सुनावाल्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे.