अकोला- श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात सोमवारी सकाळपासून कावडधारकांनी पुर्णा नदीतून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला. जयभोलेच्या गजरात कावडधारी गांधीग्राम येथून अनवाणी पायाने शहरात पहाटे दाखल झाले.
अकोल्यात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा उत्सव असतो. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक येथे येत असतात. या उत्सवानिमित्त भाविक राजराजेश्वर मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी रीघ लावतात.
कावडधारकांमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मंदिरात रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी असते. त्यामुळे येथे मंदिराचे सेवाधारी, संचालक मंडळ आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येतो.