अकोला : अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूकीची आचारसंहिता लागली आहे. त्यासोबतच या निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी होत आहे. तत्पूर्वी प्रचारतोफा थंडावल्या होत्या. प्रचारही बंद ठेवण्याचे आदेश उमेदवार आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. या निवडणुकीत तिसऱ्यांदा भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. दरम्यान, प्रचाराची वेळ संपल्यानंतर ही ते एका कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांच्यावर निवडणूक भरारी पथकाने राजपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
गैरसमज झाला असावा : या घटनेची आपल्याला माहिती नाही. हा गुन्हा कधी व का दाखल झाला आहे याची मी माहिती घेतो अशी प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली आहे. विशेष म्हणजे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या शोक सभेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. पाटील हे तिथे गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला काय अशीही चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळेस जमलेल्या लोकांमुळे तीथे सभा भरवली असे वाटले. त्यामुळे तसा गैरसमज झाला असावा असही ते म्हणाले आहेत.
'नुटा'चे वर्चस्व : अमरावती पदवीधर मतदार संघावर सलग ३० वर्षे 'नुटा' या संघटनेचे वर्चस्व होते. (२०१०)मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनी सलग पाचवेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे बी.टी देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर व्यावसायिक संघटनांची शक्ती क्षीण होत राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत गेल्याचे चित्र दशकभरात दिसून आले आहे. 'नुटा' या संघटनेने अजूनही कुणालाही पाठिंबा घोषित केलेला नाही. गेल्या निवडणुकीत देखील नुटाने मतदारांनी स्वविवेकाने मतदान करावे असे आवाहन केले होते. दुसरीकडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विज्युक्टा, यासारख्या संघटनांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे.
भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढत : भाजपसाठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी डॉ. रणजित पाटील हे राज्यमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडील सर्व खाती त्यांच्याकडे होती. पण, आता त्यांच्याकडे मंत्रिपद नाही. पक्षसंघटनेवरच त्यांची भिस्त आहे. दुसरीकडे, सरकारविरोधी मतांची एकजूट करणे हे धीरज लिंगाडे यांचे लक्ष्य आहे. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढतीची शक्यता वर्तवली जात असतानाच अन्य उमेदवारांचे उपद्रवमूल्य कुणासाठी नुकसानकारक ठरणार याचे औत्सुक्य आहे.
हेही वाचा : मी माझ्या लोकांसोबत चाललो! राहुल गांधींना अश्रू अनावर; ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा समारोप