अकोला - शहरासह जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. अकोल्यासह जिल्ह्यात सकाळपासून कडक ऊन होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले. अचानक विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी जोरदार वारा, विजांचा कडकडाटांसह पावसाची रिपरिप झाली. वातावरणातील बदलामुळे थंडावा निर्माण झाला होता. हे वातावरण ग्रामीण भागातही होते. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याची माहिती आहे. कडक ऊन असताना वातावरणातील हा बदल आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कोरोना विषाणूचा रुग्ण अकोल्यात अद्याप आढळला नसला तरी विदेशातून येणारे नागरिक होम-क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर या वातावरणाचा परिणाम झाला तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.