अकोला - धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाजातील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
देशातील इतर राज्यात धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे. परंतु, महाराष्ट्र राज्यात या समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. राज्यातील हा समाज अजूनही दुर्लक्षित आहे. या समाजातील शैक्षणिक स्तर अजूनही कमी आहे. त्यामुळे या समाजाचा स्तर उंचावण्यासाठी आरक्षण देणे गरजेचे आहे. समाजातील एकही व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला नाही. तसेच या समाजातील व्यक्ती बड्या पदावर कार्यरत नाही. शिक्षणापासून दूर असलेल्या या समाजाला आरक्षण देऊन सामाजिक व शैक्षणीक स्तर वाढवावा, अशा मागणीचे निवेदन धनगर समाजातील युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.