ETV Bharat / state

अकोल्यात कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरून युवतीने घेतली उडी, कारण अस्पष्ट - हाँरीझन कोचिंग क्लासेस

अकोल्यातील हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आलेल्या एका विद्यार्थीनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे. यात ही युवती गंभीर जखमी झाली आहे. मात्र या युवतीने उडी का घेतली ते समजू शकले नाही.

हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आलेल्या एका विद्यार्थीनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:14 PM IST

अकोला - शहरातील तोष्णीवाल लेआऊटमध्ये हाँरीझन कोचिंग क्लासेस हा एक खासगी क्लास आहे. मंगळवारी येथे शिकवणीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तीच्या या कृत्यापाठीमागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे

अकोल्यात कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरून युवतीने घेतली उडी

अकरावीचे शिक्षण घेत असलेली ही युवती नेहमीप्रमाणे मंगळवारी हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये आली होती. त्यानंतर काही वेळाने ती शिकवणी वर्ग असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेली दिसून आली. स्थानिक नागरिकांना ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थिनी ही शहरातीलच कृषी नगर भागातील रहिवासी आहे. दरम्यान, विद्यार्थिनीचे आत्महत्येचा प्रयत्न केला, की तिला आत्महत्येला प्रवृत्त केले याचा पोलीस तपास करत आहेत.

या युवताची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेनंतर युवतीच्या वडिलांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात कोचिंग क्लासच्या विरोधात तक्रार देण्यास गेले होते. पोलिसांनी मात्र युवतीच्या जबाबानंतर योग्य ती कारवाई करू, असा विश्वास त्यांना दिला आहे.

Intro:अकोला - तोष्णीवाल लेआऊटमधील हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थीनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, युवतीचे वडिल सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कोचिंग क्लासच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, युवतीच्या बयाणानंतर योग्य ती कारवाई करू, असा विश्वास पोलिसांनी त्यांना दिला आहे.Body:अकरावीचे शिक्षण घेत असलेली युवती नेहमीप्रमाणे मंगळवारी हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये आली होती. त्यानंतर काही वेळाने ती शिकवणी वर्ग असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेली दिसून आली. स्थानिक नागरिकांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थिनी ही शहरातीलच कृषी नगर भागातील रहिवासी आहे. दरम्यान, विद्यार्थिनीचे आत्महत्येचा प्रयत्न केला, की तिला आत्महत्येला प्रवृत्त केले हे पोलिस तपासात समोर येणार आहे. या घटनेचा तपास सिव्हिल लाइन्सचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल नांदे करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.