अकोला - जिल्ह्यात मंगळवारी ४५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५, कोविड केअर सेंटर मधून ३६, हॉटेल रिजेन्सी येथून ३ व ओझोन हॉस्पिटल मधून एक अशा ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये दोन महिला व सात पुरुष आहेत. यात कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व सिरसो मुर्तिजापुर, अकोट, गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर, करोली चोहटा बाजार येथील रहिवासी आहेत.
पातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला ५ जुलै रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. माना ता. मुर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मुर्तिजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १८८८+२१= १९१०
मृत्यू-९७(९६+१)
डिस्चार्ज- १५९३
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- २२०