अकोला - अकोल्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या 135 अहवालामध्ये 15 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 120 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1178वर पोहोचली आहे. उर्वरित अहवाल सायंकाळी येणार असल्याने त्यामध्ये किती रुग्ण पॉझिटिव्ह सापडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व दहा पुरुष आहेत. शंकर नगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे जवळ, लाडीजफाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केंद्रावरील आहेत.
प्रशासनाला आज मिळालेल्या 135 अहवालापैकी 120 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1178वर पोहोचले असून 752 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 64वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 362 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवाल- 135
पॉझिटिव्ह- 15
निगेटिव्ह-120
कोरोना रुग्णसंख्येची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 1178
मृत - 64(63+1)
डिस्चार्ज - 752
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 362